Sarvaay

Technology Solutions

Jaggery Processing Plant

Processing capacity:  5-6 TCD (ton sugarcane crushing per day)

Jaggery produced: 500-600 kg /day

Processing area: 2000 sq. ft shed (40 ft x 50 ft)

Number of people: 5-6 people / shift

Jaggery processing in India

India has a tradition of processing sugarcane using small processing plants for manufacturing of unrefined sugar known as jaggery. As jaggery is an unrefined product, it retains its minerals like Iron, Calcium and Potassium and provides a healthy sweetener which is a substitute for refined sugar. The traditional jaggery processing plants have rudimentary and primitive plant design and operation. This leads to unhygienic processing and use of chemical additives. A process expert is required to manage and control the jaggery processing operations. The labor working in such plants are exposed to harsh working conditions and drudgery due to manual and continuous mixing, filtering and transferring liquids from one pan to another at high temperature. The evaporation furnace has low thermal efficiency leading to use of plastic, tyres, and other combustible waste.

Our solution

SARVAAY Solutions have developed a patented technology solution as Resource Efficient Jaggery Processing (REJP) plant. Our solution is a credible option for sugarcane farmers for improving their livelihood through entrepreneurial opportunity. The plant creates respectable local employment with improved working conditions which reduce drudgery (physical work) and exposure to high temperature. The plant has scientific controls and operating parameters which enhances the operational safety. The energy efficient operation discourages use of toxic combustible waste like used tyres and plastic.

संसाधन कार्यक्षम गुळ प्रक्रिया प्रकल्पात गुर्‍हाळातील कढईला थेट उष्णता देणार्‍या संरचनेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. या तंत्रज्ञानात वापरल्या जाणार्‍या कढाई व भट्टी यांची निर्मिती कारखान्यात यांत्रिकी अभियांत्रिकीच्या निकषावर केली जाते व गुर्‍हाळाच्या जागेवर प्रकल्प जोडला जातो. कार्यक्षम गूळ प्रक्रिया प्रकल्प हा २००० चौरस फुटामध्ये बसतो. या प्रकल्पामध्ये आपण ५००-६०० किलो गुळाची निर्मिती २०-२४ तासात करू शकतो, या प्रकल्पाची ऊस गाळप क्षमता ही ५-६ टन प्रतिदिन इतकी आहे.

या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने गुर्‍हाळाच्या भट्टीची संरचना ज्वलन कार्यक्षमतेला पूरक अशी असून त्यामध्ये भट्टीचे आकारमान व क्षेत्रफळ यांचा योग्य तो समन्वय उष्णता अभियांत्रिकीच्या निकषांवर केला आहे. कामगारांचे कष्ट व जोखमीची कामे कमी करण्यासाठी कढाई ही कमरेच्या उंचीवर बसवली असून त्याभोवती चालण्यासाठी सुलभ आशी रचना केली आहे. भट्टीच्या सुलभ संरचनेमुळे स्वच्छता ठेवणे सोपे झाले आहे. या प्रकल्पात संगणकीय कंट्रोलद्वारे भट्टीतिल जाळाचे व कढाईतिल रसाचे तापमान मोजून योग्य ते चालवण्याचे निर्देश देण्याचे व नियंत्रण करण्याचे तंत्रज्ञान अवलंबिले आहे.

कार्यक्षम गुळ प्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये वाफ्यात रसाच्या चाचणीला घोटून वेगवेगळ्या स्वरूपाचा गुळ म्हणजेच गुळाचे रवे, वड्या, कणी, पावडर इत्यादी गोष्टी सहजपणे बनवता येतात. या तंत्रज्ञानामध्ये तयार झालेली कणी व पावडर ही सुकवण्यासाठी ड्राईंग रूममध्ये (सुकवण्याची खोलीमध्ये) ठेवली जाते. ड्राईंग रूममध्ये लागणारी गरम हवा तयार करण्यासाठी कार्यक्षम गुळ प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या चिमणीतून जाणारी टाकाऊ उष्णता (वेस्ट हिट) वापरली जाते.

Plant key benefits

Discipline of industry – measured and scientific process management (no gut-feel based decision making)

Independence –operations without the jaggery expert (Manageable operation)

Compact and packaged solution –smaller footprint and shorter installation time

Strong business case – consistent, superior quality and chemical additive free jaggery powder fetch higher market price

Pride in ownership –patented technology, chemical free process, smart operations and hygiene friendly design

औद्योगिक शिस्त- प्रमाणबद्ध व विज्ञानाच्या आधारे गूळ प्रक्रिया नियोजन

कुशल कामगारांना पासून मुक्ती- अल्पशा प्रशिक्षणानंतर कोणताही कामगार गुळ बनवू शकतो

जागेचा सचोटीने वापर- प्रकल्प हा कमी जागेत बसतो व त्याची संरचना ही स्वच्छता ठेवण्यास पूरक

गुंतवणुकीला चांगला परतावा- प्रकल्पामधून तयार होणारा गुळ व गुळ पावडर ही रसायनमुक्त, चांगल्या प्रतीची व बर्‍याच अंशी एकसारखी यामुळे चांगला बाजार भाव व मागणी

प्रकल्पाचा मालक असल्याचा अभिमान- पेटंट केलेले तंत्रज्ञान, केमिकल विरहित प्रक्रिया, संगणकाचा नियंत्रणासाठी वापर व स्वच्छता पूरक संरचना

Details

Technology video English July 2019

https://www.youtube.com/watch?v=LY86ZjuAlW4&t=38s

तंत्रज्ञानाचा मराठीत व्हिडिओ जुलै २०१९

https://www.youtube.com/watch?v=gJyLkddRCKc&t=381s

तंत्रज्ञानाचा नवीन प्लांटचा मराठीत व्हिडिओ मे २०२१

https://www.youtube.com/watch?v=HBcQzpWRBrw&t=9s

Technology new plant English May 2021

https://www.youtube.com/watch?v=JRj3JVayHWE&t=34s

बळीराजा मासिकातील लेख जून २०२१

https://www.digitalbaliraja.com/Encyc/2021/6/1/Jaggery-industry-strategy-planning-and-new-technologies.html